राणेंसह भाजपच्या काही नेत्यांना केंद्राची सुरक्षा, सीआयएसएफ जवान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 01:11 AM2021-01-21T01:11:52+5:302021-01-21T06:55:41+5:30

राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत.

Some BJP leaders, including Rane, have security from the Center, CISF personnel deployed | राणेंसह भाजपच्या काही नेत्यांना केंद्राची सुरक्षा, सीआयएसएफ जवान तैनात

राणेंसह भाजपच्या काही नेत्यांना केंद्राची सुरक्षा, सीआयएसएफ जवान तैनात

Next

मुंबई : भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांच्यासह भाजपच्या राज्यातील अन्य काही नेत्यांना लवकरच सीआयएसएफकडून सुरक्षा प्रदान केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशिष शेलार आणि भाजपच्या अन्य काही नेत्यांची सुरक्षा अलीकडे एकतर कमी केली किंवा काढून घेतली होती.

राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत. राणे यांना दिलेल्या सुरक्षेत ११ जवानांचा समावेश आहे.
 

Web Title: Some BJP leaders, including Rane, have security from the Center, CISF personnel deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.