शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

साेलापूरमध्ये लढत तरुणाईची; प्रणिती शिंदे बाजी मारणार की, भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 8:40 AM

संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे. 

राकेश कदम

साेलापूर : साेलापूर लाेकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दाेन युवा आमदारांमध्ये थेट लढत आहे. मागील दाेन निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. प्रणिती शिंदे बाजी मारणार की भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार? याकडे लक्ष आहे. 

साेलापूर लाेकसभेत चार भाजप, एक काँग्रेस आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे या शहर मध्यच्या आमदार आहेत; तर सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ‘साेलापूर अन् परका’ असा मुद्दा आणला. तर, दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने ४० वर्षांत काय केले, भाजपचे दाेन खासदार कसे निष्क्रिय ठरले, या मुद्द्यांवर भाषणे सुरू आहेत. संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे, तर भाजपचे दाेन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा वाटत आहे. 

गटातटाचा काय हाेणार परिणाम ?काँग्रेसचे सर्व गट सध्या एकत्र आहेत. शरद पवार गट, उद्धवसेनेचा गटही त्यांच्यासाेबत आला आहे. भाजपकडून दहापेक्षा अधिक लाेक इच्छुक हाेते. माेहाेळमधील क्षीरसागर कुटुंंबातील एक गट भाजपपासून दुरावला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, साेलापूर शहर या भागात भाजपचे दाेन-दाेन गट कार्यरत आहेत. हे गट पक्षाच्या प्रचारात सक्रिय आहेत. परंतु, यांचा एकत्र मेळ घालण्यासाठी  पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येते. 

यांची प्रतिष्ठा पणालाकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आपली कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी साेलापुरात तळ ठाेकून आहेत. शिंदे हे राज्यातील काँग्रेस ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्रीपद भूषवितानाही त्यांचा स्थानिक पातळीवर दांडगा संपर्क आहे. भाजपचे राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे भाजपच्या चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • शहरातील सहा दिवसांआड पाणीपुरवठा,  सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम.
  • अजूनही सुरू न झालेली विमानसेवा, कांदा निर्यातबंदी, साेयाबीन व इतर शेतमालाचे पडलेले भाव, स्मार्टसिटीचा अपेक्षाभंग.
  • शहरातून पुणे, हैदराबादला हाेणारे स्थलांतर,  मराठा, धनगर आरक्षण
टॅग्स :solapur-pcसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४