शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"पराभूत आणि खचलेली मानसिकता..."; प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 18:04 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे रिंगणात उतरल्या आहेत. त्यात या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.

सोलापूर - Ram Satpute on Congress ( Marathi News ) प्रणिती शिंदेंचं ट्विट म्हणजे पराभूत आणि खचलेली मानसिकता, मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार, इथल्या जनतेची सेवा करतोय. माझ्या आई वडिलांनी या भागातील अनेक कारखान्यावर ऊसतोडीचं काम केलंय त्यामुळे यांची पराभवाची मानसिकता असल्याने अशी विधाने करतात असं प्रत्युत्तर भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसप्रणिती शिंदेंना दिले आहे. 

राम सातपुते म्हणाले की, जर पक्षाच्या एकेकाळच्या अध्यक्षा इटलीहून आलेल्या चालल्या, राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन निवडणूक लढवलेले चालते. भारतीय जनता पार्टीचा विजय आणि या लोकांचा पराभव होताना दिसतोय. ही खचलेली मानसिकता आहे. येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपाचा विजय होईल. पुन्हा एकदा सोलापूरात भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असंही त्यांनी सांगितले. 

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या 'लेटर'वॉर

लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच् याप्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपाचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. त्यात आज प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित भाजपाच्या राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते असं म्हणत प्रणिती शिंदेंनी ही निवडणूक स्थानिक  विरुद्ध बाहेरचा असं होणार असल्याचे संकेत दिले. 

तर "राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. "मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. आमदार म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय असं पत्र सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना पाठवलं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस