सामाजिक कार्यकर्तेही लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:02 IST2019-03-01T06:02:00+5:302019-03-01T06:02:03+5:30
पर्यायी राजकारणाचा आग्रह; काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप

सामाजिक कार्यकर्तेही लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत
- सुधीर लंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : देशातील सध्याचे सरकार परवडणारे नाही म्हणून सर्व लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध घटकांनी थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरुन पर्यायी राजकारण उभारावे, असा एक मतप्रवाह सुरु झाला आहे. या कार्यकर्त्यांच्या पुणे तसेच जालना, सांगली येथे काही बैठकाही झाल्या आहेत.
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, पर्यावरणतज्ज्ञ विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, पारोमिता गोस्वामी, प्रतिभा शिंदे,चंदू चव्हाण, कुमार नागे, डॉ. मिलींद मुरुरकर, पल्लवी रेमणे, नंदू माधव, हेरंब कुलकर्णी यांसह विविध आघाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते पुण्यातील बैठकीला उपस्थित होते. देशात मोदी सरकारच्या काळात लोकशाहीविरोधी प्रवृत्ती वाढल्या आहेत. याबाबत या सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत चिंता व्यक्त केली. केवळ बघ्याची भूमिका न घेता थेट निवडणुकीत उतरण्याची तयारी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
इतरांचा विचार का केला जात नाही?
कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांच्यासोबत चर्चा केली आहे. काँग्रेस व राष्टÑवादीचे नेते पारंपरिक राजकीय गणितांमधून बाहेर येत नाहीत. घराणेशाही व धनिकांच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारात घेताना दिसत नाही.