शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची अजमेर शरीफ दर्ग्याला भेट? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:22 AM

आदित्य ठाकरेंचा फोटो सोशल मीडिया व्हायरल

मुंबई: विधानसभेच्या निकालानंतर चार दिवस गेले तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. सत्तेचं समसमान वाटप व्हावं यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेकडून भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करून भाजपानं खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना आणि भाजपा दबावाचं राजकारण करत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे चर्चेत आले आहेत. ठाकरे यांचा पगडीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आदित्य ठाकरेंनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट देऊन मन्नत मागितली, अशा मजकूरासह आदित्य यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.गौरव प्रधान नावाच्या व्यक्तीनं आदित्य यांचा एक फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे. 'मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेचा राहुल गांधी आज अजमेर शरीफ दर्ग्याला पोहोचला,' असा मजकूर या फोटोसह ट्विट करण्यात आला आहे. तीन हजारहून अधिक लोकांनी हे ट्विट लाईक केलं असून एक हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. ट्विटरसोबतच फेसबुकवरदेखील हा फोटो चर्चेत आहे.  या फोटोची सत्यता शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा हा फोटो चार महिने जुना असल्याची माहिती समोर आली. जून महिन्यात आदित्य ठाकरेंनी ख्याजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दर्ग्यावर चादर चढवली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं चांगली कामगिरी केल्यानंतर आदित्य यांनी दर्ग्याला भेट दिली होती. यासोबतच त्यांनी ठाकरे कुटुंबाची कुलदेवी एकविरा देवीचं आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं होतं. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा