शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

...तर जनतेने कोणाकडे पाहायचे?

By admin | Updated: December 5, 2014 03:56 IST

मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आ

अतुल कुलकर्णी, मुंबईमरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्यांचे ते कामच आहे. ते देखील होत नसेल तर जनतेने पाहायचे कोणाकडे अशा शब्दात राजकीय पक्षांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.गतवर्षी पासून मरीन ड्राईव्हवर सुरु झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व कोणी करायचे हा मुद्दा महत्त्वाचा नाही त्याहीपेक्षा देशासाठी ज्यांनी कर्तव्य बजावत प्रसंगी आपले प्राण दिले त्यांची माहिती नव्या पिढीला कळायला हवी या हेतूने या परेडकडे सगळ्यांनीच पाहावे. यातून आपलेपणाची भावना वाढीस लागते हे पोलिसांनी देखील विसरु नये अशी प्रतिक्रिया देत शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मरीन ड्राईव्हवर परेड करण्याचे समर्थन केले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. गेल्या वर्षी जर दिमाखात ही परेड मरीन ड्राईव्हवर होऊ शकते तर यावर्षी का नाही, असे सांगून काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या वर्षीपासून देशभक्ती जागवण्याचे काम करणारी सुरु झालेली परंपरा याही वर्षी चालू राहिली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर १९७० च्या दशकात आपण शाळेत असताना चौपाटीवर परेडसाठी जात होतो असे सांगून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, दिल्लीनंतर मुंबईच्या परेडने गेल्या वर्षी देशात महाराष्ट्राची मान ताठ केली होती. देशभक्तीच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारने याबाबतीही बाणेदारपणा दाखवावा, असे आव्हानही मलिक यांनी केले.