शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

... तर शरद पवार यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याशिवाय पर्याय नाही: भाजप नेत्याची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 14:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, कारण ती आमची संस्कृती आहे...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच कारण ती आमची संस्कृती आहे. पण भारतीय जनता पार्टीला जर पश्चिम महाराष्ट्रात आपले काम वाढवायचे असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, अशी कबुली खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. पाटील म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते समोर आले की मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. पण शरद पवार यांच्यावर आम्ही टीका करत असलो तरी राजकारणात मैत्री असायलाच हवी. 

शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊच शकत नाही असे वेळोवेळी बोलले जाते. तसेच देश किंवा राज्यातील राजकारणात ते नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले पाहायला मिळाले आहे. आजपर्यंत पवारांनी अनेक मातब्बर नेते राज्याला दिले आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष देखील पवार यांचे मत व मार्गदर्शनाला गांभीर्याने घेत असतात.

सर्वांनाच दिलासा देणारा अर्थसंकल्प.. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांना आनंद आणि दिलासा देणारा आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक गाडा खाली उतरला असताना तो गाडा रुळावर आल्याचे या अर्थसंकल्पावरून स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा वाढवली. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन बजेटमध्ये आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 40 हजार कोटी दिले आहे. या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा