...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:44 AM2019-12-19T11:44:46+5:302019-12-19T11:45:04+5:30

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती.

... So let's extend the Cabinet on the 23rd - Ajit Pawar | ...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार

...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवार

googlenewsNext

नागपूरः मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. पवारसाहेबांनी सांगितलं की, नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सहा मंत्री काम करतील. नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 21 तारखेला अधिवेशन संपत आहे, 22 तारखेला सुट्टी आहे आणि 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.

अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

काल काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात मुक्कामाला आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि पवार साहेबांची भेट दुपारी ठरलेली आहे. भेट झाल्यानंतर पवारसाहेब औरंगाबादला जातील. पवारसाहेबांचा औरंगाबादला कार्यक्रम आहे. कर्जमाफीसंदर्भात काल बैठक होणार होती, पण ती काल होऊ शकली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, जीएसटीचा हिस्सा या सगळ्या गोष्टी पाहूनच कर्जमाफी करावी लागणार असल्याचंही अजितदादा म्हणाले आहेत.  
 

Web Title: ... So let's extend the Cabinet on the 23rd - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.