... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:07 IST2025-01-03T12:07:02+5:302025-01-03T12:07:47+5:30

वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी आणखी एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

... So let's do your second Massajog Santosh Deshmukh; Sarpanch husband was robbed by illegal businessmen threatening and beating him buldhana crime news | ... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

मस्साजोगच्या सरपंचांच्या निर्घृण हत्येला आता महिना होत आला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्याच्यावर या हत्ये प्रकरणाचे आरोप होत आहेत त्या वाल्मीक कराडला अटक झाली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी आणखी एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा खास असल्याने कराडला वाचविण्यात येत असल्याचे आरोप होते होते. विरोधकांनी आणि लोकांनी प्रचंड दबाव आणल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेला कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला आहे. यात मोठी डील झाल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. आकाला वाचविण्यासाठी कराडला शरण येण्यास भाग पाडण्यात आले असेही सांगितले जात आहे. अशातच या गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नसताना इतर अवैध धंदेवाल्यांचाही धीर वाढू लागल्याचे बुलढाण्याच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. 

अवैध धंदे चालू दिले नाहीत तर तुझा संतोष देशमुख करेन अशी धमकी देत 1 लाख 27 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. कलंबेश्वर येथील सरपंच पतीचा गळा आवळून तिघांनी मारहाण करत खिशातील नगदी पैसे आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार केली आहे. 

खुरद यांनी गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गावातीलच चिडलेल्या अवैध धंदे वाल्यांनी रस्त्यात अडवून सुभाष खुरद यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. याप्रकरणी अवैध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड, आकाश सपकाळ सह इतर तीन आरोपी, अशा पाच आरोपींवर कलम 309 (2), 115(2) 352, 351(2), 351 (3) 3(5) BNS -2023 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ मोरे यांनी सांगितले आहे. 

Web Title: ... So let's do your second Massajog Santosh Deshmukh; Sarpanch husband was robbed by illegal businessmen threatening and beating him buldhana crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.