शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

...तर आमची वाहने बँका, फायनान्स कंपन्यांकडे जमा करू; वाहतुक संघटनांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:11 IST

राज्यभर २ सप्टेंबरला बँकांसमोर निदर्शने

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक वाहने व्यवसाय ठप्प

पुणे :  वाहनांचे हप्ते फेडीसाठीची मॉरिटोरियमची मुदत ३१ आॅगस्टला संपत आहे. ही मुदत वाढवून द्यावी, व्याज माफ करावे आदी मागण्यांसाठी राज्यातील वाहतुक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी (दि. २) बॅका व कंपन्यांसमोर निदर्शने केली जाणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. १० सप्टेंबर रोजी सर्व वाहने बँक व फायनान्स कंपन्यांमध्ये जमा करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक वाहने मागील पाच महिन्यांहून अधिक काळ जागेवरच उभी आहेत. व्यवसाय नसल्याने वाहतुकदारांना बँका व फायनान्स कंपन्यांचे हप्ते फेडणेही कठीण झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत केंद्र सरकारने हप्त्यांमधून दिलासा देण्यासाठी मॉरिटोरियमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे वाहतुकदारांची काही महिने हप्त्यांमधून सुटका झाली. हा कालावधी दि. ३१ आॅगस्ट रोजी संपत आहे. दि. १ सप्टेंबरपासून पुन्हा कर्जाचे हप्ते सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे शासनाने अद्यापही व्यावसायिक वाहनांना परवानगी दिलेली नाही. बँका व फायनान्स कंपन्यांकडून हप्त्यांसाठी तगादा सुरू झाला आहे, अशी माहिती पुणे डिस्ट्रीक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर व पुणे बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिली.मॉरटोरियम कालावधी वाढवून देण्याची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी दि. २ सप्टेंबर रोजी बँका व कंपन्यांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दि. १० सप्टेंबर रोजी राज्यभरातील सवॅ बॅका व फायनान्स कंपन्यांमध्ये सर्व प्रकारची वाहने जमा करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाला राज्यभरातील विविध वाहतुक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. -----------------वाहतुकदारांच्या मागण्या-- मॉरिटोरियम कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढविणे- दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करणे- उर्वरित कर्जासाठी हप्त्यांमध्ये सवलत देणे- लघुउद्योगांमध्ये येणाऱ्या वाहनधारकांना कर्ज मिळावे-------

टॅग्स :Puneपुणेstate transportएसटीpassengerप्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सbusinessव्यवसाय