शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 14:44 IST

आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष संपूर्ण शक्तीनिशी प्राचार करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून भाजपमधील प्रेवेशासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. 

शिंदे म्हणाले, "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आणल्याने या जिल्ह्याची आणि महायुतीची ताकद वाढली आहे. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिला. बाबासाहेब म्हणाले होते, 'काँग्रेस हे जळक घर आहे, यापासून दूर रहा'. हे बरोबर अशोक चव्हाण यांनी ते ऐकले." यावेळी, "जोवर सूर्य आणि चंद्र असेल, तोवर बाबासाहेबांचे संविधान कायम राहील," असेही शिंदे म्हणाले. 

कुणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही -शिंदे पुढे म्हणाले, "इथे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, लाडके भाऊ आलेले आहेत, सगळे लाडके आहेत. माझं एक काम कराल? लाडक्या बहिणींनी जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत, त्यांना सांगाल, आम्ही आता आमचा लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आलो आहोत. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, कुणीही आले तरीसुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही."

निवडून आले, म्हणाले पैसे नाही -"आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील. आम्ही ३००० रुपये देतो, अरे देणार कुठून? सरकार मध्ये तुम्ही आहात का? कर्नाटकात, तेलंगणामध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये घोषणा केल्या, आम्ही हे देतो, ते देतो, ते देतो, निवडून आले, म्हणाले पैसे नाही.  केंद्राकडे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे तुम्हाला काही वाटायला हवे, खोटे बोलायला. खोटे बोल पण रेटून बोल. हे फसवणारे, खोटारडे, हे खोटे नॅरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत त्यांनी फसवले. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या लोकांना घाबरवलं, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, शिखांना घाबरवलं आणि फेक नॅरेटिव्ह पसरवला," असेही शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAshok Chavanअशोक चव्हाणMahayutiमहायुती