शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:37 IST

राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे.

अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत ८ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. या शपथविधीला राष्ट्रवादीचे तीन खासदार उपस्थित होते. यापैकी दोन खासदारांवर कारवाईचा प्रस्ताव पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली आहे. 

राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे समजते आहे. 

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली आहे. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्‍यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला आहे. 

या शपथविधीला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे देखील होते. त्यापूर्वी ते अजित पवारांच्या बंगल्यावर देखील होते. आपण वेगळ्या कामासाठी गेलेलो, तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती, असा खुलासा कोल्हे यांनी केला आहे. तसेच तेव्हा आपण सुप्रिया सुळे यांनादेखील भेटल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी अजित पवारांचा निर्णय आपल्याला पटला नसल्याचा खुलासा केला आहे. मी शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या भुमिका साकारतो. यामुळे असे करणे योग्य नसल्याचा विचार मी केला आहे. यामुळेच मी माझी भूमिका आज मांडली आहे, असे कोल्हे म्हणाले आहेत. 

कोल्हे परत आल्याने सुप्रिया सुळेंनी कोल्हेंवरील कारवाई रद्द केल्याची चर्चा सुरु झाली आहे. पटेल, तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शरद पवारांनी काल दिला होता. ५ जुलैला पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, त्यानंतर कोणावर कारवाई करायची कोणावर नाही हे स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे