शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

देशात हाहाकार उडविणाऱ्या ' त्या ' व्हिडिओ पाठीमागे सोळा वर्षांचा तरुण ! पुणे पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:49 PM

लोकांनी विशिष्ट खाद्यपदार्थ खाणे बंद केल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान

ठळक मुद्देराज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सायबर पोलिसांकडे केला होता तक्रार अर्ज दाखल स्वत:च्या अल कुराण सेईंग या यू-ट्यूब चॅनलवर टाकला होता बनावट व्हिडीओ

पुणे : ‘विशिष्ट खाद्यपदार्थामुळे होतो कोरोना’ हा बनावट व्हिडीओ बनवून तो यू-ट्यूबवर टाकणाऱ्यांचा तपास पुण्याच्या सायबर पोलिसांनी लावला आहे. उत्तर प्रदेशातील एक १६ वर्षांचा मुलगा आणि काकीनाडा येथील ४२ वर्षांची व्यक्ती यांनी हे बनावट व्हिडीओ टाकले होते.मोहम्मद अब्दुल सत्तार (वय ४२, रा़ शहासेबगल्ली, गोदावरी ईस्ट, काकीनाडा, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. घड्याळदुरुस्तीचे दुकान असून, त्याने स्वत:च्या अल कुराण सेईंग या यू-ट्यूब चॅनलवर हा बनावट व्हिडीओ टाकला होता. तो देशभर फिरला. त्यामुळे लोकांनी विशिष्ट खाद्यपदार्थ खाणे बंद केल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजूर्ग येथील महिलेच्या मोबाईलवरून अपलोड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते सिमकार्ड तिने जवळच्या गावात राहणाºया तिच्या बहिणीच्या १६ वर्षांच्या मुलाला दिले होते. तो मुलगा वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरसची लागण विशिष्ट खाद्यपदार्थामुळे होते, असा व्हिडीओ त्याला मिळाला होता. त्याची खातरजमा न करता त्याने स्वत:च्या ‘फाइनटेचसूरज’ नावाच्या स्वत:च्या यू-ट्यूबवर अपलोड केला होता. या महिलेने दिलेल्या मोबाईलचा वापर करीत असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. नोव्हेल कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथून प्रसारित झालेले दोन व्हिडीओ देशभर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि यू-ट्यूब यावर देशात तसेच राज्यामध्ये विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला. कुक्कुट उत्पादनामुळे कुक्कुट खाद्यनिर्मिती व कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो, अशा अशास्त्रीय व निराधार अफवा आहेत. 

राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या परवानगीने सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला. उत्तर प्रदेश व काकीनाडा येथून दोन व्हिडीओ प्रसारित झाल्याचे पुढे आले होते. या ठिकाणी पोलिसांनी पथके पाठवून तपास केला. त्यात उत्तर प्रदेशातील १६ वर्षांच्या मुलाने हा व्हिडीओ अपलोड केला होता. हा मुलगा व मोहंमद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविणार आहे. तसेच अफवा पसरविणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्याद्वारे कारवाई करणार असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे यांनी सांगितले. ......अशास्त्रीय व निराधार अफवा च्विशिष्ट खाद्यपदार्थ उत्पादनामुळे नोव्हेल कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो, या पूर्णत: अशास्त्रीय व निराधार अफवा आहेत़ असे पशुसंवर्धन खात्याने घोषित केले आहे. च्पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पो. उ. अनिल डफळ, अजित कुऱ्हे , हर्षल दुसाने, प्रसाद पोतदार यांनी ही कामगिरी केली..........

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस