एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले
By Admin | Updated: October 1, 2016 21:19 IST2016-10-01T21:19:15+5:302016-10-01T21:19:15+5:30
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात जावून एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले.

एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेले
ऑनलाइन लोकमत
निजामाबाद, दि. १ - पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात जावून एकाच कुटुंबातील सहा जण वाहून गेल्याची घटना शनिवारी पिटलम (जि़ निजामाबाद) येथे घडली़ सायंकाळी उशिरा सहाही जणांचे मृतदेह हाती लागले.
टी़राजामणी (वय ३९), ज्योती (वय ९), प्रिया (७), ज्ञाना समिती (३), दिपाशा (१० महिने, सर्व रा़तडकल जि़मेदक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यातील दिपाशा आजारी असल्याने उपचारासाठी सर्वजण कारने पिटलम येथे आले होते़ उपचारासाठी येताना पिटलमजवळून वाहणाऱ्या पिल्ली नदीला पाणी कमी होते़.
उपचार करून परत जाताना नदीचे पाणी प्रचंड वाढले़ यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न चालकाने केला़ मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कारसह सर्वजण वाहून गेले़ एका झाडाचा आधार मिळाल्याने कारचालक बचावला़ इतर वाहून गेले़ सायंकाळी उशिरा सर्वांचे मृतदेह सापडले. त्यांचे शवविच्छेदन पिटलम येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.