शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महारेराची राज्यातील बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 08:39 IST

१५ एप्रिलपूर्वी मुदत संपणाऱ्या प्रकल्पांना ही मुदतवाढ लागू होणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.

मुंबई :  ज्या बांधकाम प्रकल्पांची पूर्ण होण्याची तारीख, सुधारित समाप्ती तारीख व विस्तारित समाप्ती तारीख १५ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर समाप्त होत असेल, अशा बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ एप्रिलपूर्वी मुदत संपणाऱ्या प्रकल्पांना ही मुदतवाढ लागू होणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.रेराच्या या निर्णयामुळे विविध आव्हाने झेलणाऱ्या बांधकाम क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबद्दल नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाला होता, त्यामुळे बांधकाम प्रकल्पांना मुदतवाढ मिळावी असे विविध संघटनांचे म्हणणे होते. दुसऱ्या लाटेत बांधकाम मजुरांचे स्थलांतर, बांधकाम साहित्याची दरवाढ यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांवर मोठा परिणाम झाला होता. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक मोहनानी यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेचा राज्यातील शेकडो बांधकाम प्रकल्पांवर परिणाम झाला होता. या मुदतवाढीमुळे बांधकाम प्रकल्पांवरील कमी झालेला कामगार वर्ग पुन्हा जोडण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे भविष्यात बांधकाम व्यवसायिकांना होणारे नुकसान टाळण्यासदेखील मदत होईल. क्रेडाईचे सचिव प्रीतम चिवुकुला यांनी सांगितले की, महारेराच्या या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या बांधकाम क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे मुदतवाढीचे सहा महिने बांधकाम क्षेत्राला बळकटी देणारे ठरतील.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017