शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:33 IST

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलामागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले२५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी

सोलापूर : यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे.  हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे. 

कारखान्यांकडे असलेली देय रक्कम- आदिनाथ, करमाळा- दोन कोटी ३३ लाख, भीमा, टाकळी सिकंदर- १३ कोटी ३४ लाख, सिद्धेश्वर कुमठे- ४७ कोटी ९८ लाख,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- १२ कोटी ३३ लाख, श्री विठ्ठल गुरसाळे -६७ कोटी २२ लाख,विठ्ठलराव शिंदे- ७४ कोटी ४० लाख,श्री मकाई करमाळा- २१ कोटी ७४ लाख, संत कूर्मदास- ६ कोटी ४० लाख, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील- ३२ कोटी २० लाख,  सासवड माळी शुगर-२२ कोटी ५३ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ - ६ कोटी १९ लाख, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे १६ कोटी ५६ लाख,     सिद्धनाथ शुगर तिºहे- ३३ कोटी ५८ लाख, जकराया शुगर वटवटे-१३ कोटी ५४ लाख,  भैरवनाथ विहाळ- ५ कोटी ६६ लाख, फॅबटेक- ५ कोटी २९ लाख, भैरवनाथ लवंगी- ९ कोटी ५७ लाख, युटोपियन कचरेवाडी- २७ कोटी १९ लाख, गोकुळ-२७ कोटी ५८ लाख,मातोश्री लक्ष्मी शुगर- २८ कोटी ८४ लाख, भैरवनाथ आलेगाव-३० कोटी ६९ लाख, बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी- ८ कोटी ११ लाख, सीताराम महाराज खर्डी- १० कोटी ५७ लाख,जयहिंद शुगर- १६ कोटी ९० लाख, विठ्ठल रिफायनरी, पांडे- २८ कोटी ७० लाख. 

शासनाकडून बफर स्टॉक, गोडावून भाडे आदीचे येणे आहे ती रक्कम मिळाली तरी शेतकºयांचे संपूर्ण पैसे देता येतील. सॉप्टलोन  मिळाले नसल्याची अडचण आली. तरीही आठवडाभरात शेतकºयांचे पैसे देण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ९३ टक्के पैसे दिले आहेत.- बब्रुवाहन माने-देशमुखचेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेती