सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:32 PM2019-06-07T15:32:21+5:302019-06-07T15:33:43+5:30

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी

The six factories of Solapur district paid the FRP | सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलामागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले२५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी

सोलापूर : यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे.  हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे. 

कारखान्यांकडे असलेली देय रक्कम
- आदिनाथ, करमाळा- दोन कोटी ३३ लाख, भीमा, टाकळी सिकंदर- १३ कोटी ३४ लाख, सिद्धेश्वर कुमठे- ४७ कोटी ९८ लाख,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- १२ कोटी ३३ लाख, श्री विठ्ठल गुरसाळे -६७ कोटी २२ लाख,विठ्ठलराव शिंदे- ७४ कोटी ४० लाख,श्री मकाई करमाळा- २१ कोटी ७४ लाख, संत कूर्मदास- ६ कोटी ४० लाख, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील- ३२ कोटी २० लाख,  सासवड माळी शुगर-२२ कोटी ५३ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ - ६ कोटी १९ लाख, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे १६ कोटी ५६ लाख,     सिद्धनाथ शुगर तिºहे- ३३ कोटी ५८ लाख, जकराया शुगर वटवटे-१३ कोटी ५४ लाख,  भैरवनाथ विहाळ- ५ कोटी ६६ लाख, फॅबटेक- ५ कोटी २९ लाख, भैरवनाथ लवंगी- ९ कोटी ५७ लाख, युटोपियन कचरेवाडी- २७ कोटी १९ लाख, गोकुळ-२७ कोटी ५८ लाख,मातोश्री लक्ष्मी शुगर- २८ कोटी ८४ लाख, भैरवनाथ आलेगाव-३० कोटी ६९ लाख, बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी- ८ कोटी ११ लाख, सीताराम महाराज खर्डी- १० कोटी ५७ लाख,जयहिंद शुगर- १६ कोटी ९० लाख, विठ्ठल रिफायनरी, पांडे- २८ कोटी ७० लाख. 

शासनाकडून बफर स्टॉक, गोडावून भाडे आदीचे येणे आहे ती रक्कम मिळाली तरी शेतकºयांचे संपूर्ण पैसे देता येतील. सॉप्टलोन  मिळाले नसल्याची अडचण आली. तरीही आठवडाभरात शेतकºयांचे पैसे देण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ९३ टक्के पैसे दिले आहेत.
- बब्रुवाहन माने-देशमुख
चेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव

Web Title: The six factories of Solapur district paid the FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.