बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:51 IST2017-11-27T14:50:47+5:302017-11-27T14:51:24+5:30
हदय विकाराने मृत्यु पावलेल्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सख्ख्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना घडली.

बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
राजुरा- हदय विकाराने मृत्यु पावलेल्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सख्ख्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना राजुरापासून दोन कि.मी.अंतरावरील सुकांडा येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान घडली. बहिणी सोबतच भावावरही अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाईकावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुकाडा येथील लक्ष्मीबाई शिवाजी आंधळे (५२) या सकाळी साडेसात वाजतादरम्यान आंघोळ करीत असतांना त्यांना हृदय विकाराचा जबर झटका आला. दरम्यान बाथरुममध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सुकांडा येथे रात्री १० वाजता ठेवण्यात आला होता. बहिणीच्या अंत्यविधीसाठी अंभेरी (जि.हिगोली) येथुन भाऊ संजय निवृत्ती घुगे (४६) हे परिवारासह आले होते. बहिणीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच अचानक संजय घुगे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चक्कर आली व खाली पडले.
त्यानंतर बेशुद्धावस्थेत उलटी व शौचास झाली. उपस्थितांनी त्यांना तत्काळ वाहनाद्वारे वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मीबाई आंधळे यांच्यावर रविवारी रात्री १० वाजता तर संजय घुगे यांच्यावर सोमवारी अंभेरी येथे अंतिम संस्कार झाले.