‘साहेब इकडे या’, प्रसाद लाड यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये भरत गोगावलेंनी मारली उद्धव ठाकरेंना हाक, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:30 IST2026-03-17T17:27:32+5:302026-03-17T17:30:05+5:30

Bharat Gogavale & Uddhav Thackeray News: भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मुंबईमध्ये पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार आणि राज्यसरकारमधील मंत्री भरत गोगावले आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना समोरासमोर आले.

'Sir, come here', Bharat Gogavale called out to Uddhav Thackeray at the reception of Prasad Lad's son, then... | ‘साहेब इकडे या’, प्रसाद लाड यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये भरत गोगावलेंनी मारली उद्धव ठाकरेंना हाक, त्यानंतर... 

‘साहेब इकडे या’, प्रसाद लाड यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये भरत गोगावलेंनी मारली उद्धव ठाकरेंना हाक, त्यानंतर... 

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मुंबईमध्ये पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार आणि राज्यसरकारमधील मंत्री भरत गोगावले आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना समोरासमोर आले. त्यावेळी भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब इकडे या, अशी हाक मारली. मात्र उद्धव ठाकरे यांनी ‘नको नको मी इथेच बरा आहे’, असे सांगत गोगावलेंशी जवळीक साधणे टाळले.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भरत गोगावले यांनी या भेटीबाबत सांगितले की, त्यावेळी आमच्यात काहीही संवाद झाली नाही. आम्ही पुढे गेलो होतो. तर ते  मागून आले. वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उभे होतो. तेव्हा उद्धव साहेब तिथे उभे होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, या आमच्या बाजूला उभे राहा. मात्र ते नको नको असे म्हणाले. त्यांना बोलावणं हे आमचं कर्तव्य होतं. ते आम्ही केलं. मात्र त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्यात आमचा काय दोष आहे, असेही गोगावले म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांशी बोलणं उद्धव ठाकरे बहुतांशी टाळतात, अशा परिस्थितीत प्रसाद लाड यांच्या मुलाच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.  

Web Title : गोगावले ने ठाकरे को बुलाया; प्रसाद लाड के बेटे के रिसेप्शन में उद्धव ने मना किया।

Web Summary : प्रसाद लाड के बेटे के रिसेप्शन में भरत गोगावले ने उद्धव ठाकरे को बुलाया, लेकिन उन्होंने इनकार कर दिया और बातचीत से परहेज किया। गोगावले ने कहा कि वह सिर्फ विनम्र थे, लेकिन ठाकरे उनके बगल में खड़े होने से इनकार कर दिया। विभाजन के बाद इस बातचीत पर चर्चा हो रही है।

Web Title : Gogawale invites Thackeray; Uddhav declines at Prasad Lad's son's reception.

Web Summary : At Prasad Lad's son's reception, Bharat Gogawale invited Uddhav Thackeray, who declined, avoiding close interaction. Gogawale stated he was simply being courteous, but Thackeray refused to stand beside him. This interaction is being discussed post-split.