शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाट कोसळलेला नसून पूर्णतः सुरक्षित, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 14:07 IST

आंबोली घाटातील रस्ता पूर्णतः कोसळल्याची माहिती पसरवणारी पोस्ट मंगळवारपासून (22 ऑगस्ट) सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र असे काहीही झालेले नसून आंबोली घाट पूर्णतः सुरक्षित आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.  

सावंतवाडी, दि. 23 - आंबोली घाटातील रस्ता पूर्णतः कोसळल्याची माहिती पसरवणारी पोस्ट मंगळवारपासून (22 ऑगस्ट) सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र असे काहीही झालेले नसून आंबोली घाट पूर्णतः सुरक्षित आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.  आंबोली घाट कोसळला असल्यानं रस्ता बंद करण्यात आला आहे, अशी अफवा मंगळवारी रात्रीपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या अफवेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सोशल मीडियाद्वारे फिरणा-या अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे. 

हा मेसेज सोशल मीडियावर आल्यानंतर पुणे, कोल्हापूर बेळगावातून कोकणात प्रवास करणा-यांनी जवळच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना फोन करुन खरंच घाटातील रस्ता कोसळला आहे का?, याची खात्री करत होते व त्यानंतरच घराबाहेर पडत होते.  काहींनी तर आंबोली घाट रस्त्याऐवजी दुस-या मार्गाची निवड केली. दरम्यान, सोशल मीडियावर आंबोली घाटाबाबतच्या पोस्ट फिरू लागल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (23 ऑगस्ट ) सकाळी संपूर्ण आंबोली घाट रस्त्याची पाहणी केली. यावेळी घाटातील एकही दगड कोसळला नसल्याचे आढळून आले. घाटाची पाहणी केल्यानंतर पोलीस उप-अधीक्षक दयानंद गवस यांनी आंबोली घाटात रस्ता कोसळल्याची अफवाच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान,  अफवा पसरवणा-या व्यक्तीचा शोध घेणार असल्याचे गवस यांनी यावेळी सांगितले.