गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिंदेसेना हे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले होते. त्यात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर दोन्ही पक्षांमध्ये खूपच तीव्र संघर्ष झाला होता. तसेच या निवडणुकांदरम्यान, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे हे आमने सामने आलेले दिसले होते. मात्र आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्गामध्येभाजपा आणि शिंदेसेनेची महायुती झाली असून, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचाही फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी भाजपाचे आमदार आणि मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायच समितीच्या निवडणुकीसाठीच्या या युतीचा घोषणा केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्गची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही ५ फेब्रवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी आम्ही तिन्ही पक्षांनी आघाडी करायचं ठरवलं आहे. त्यामध्ये भाजपा जिल्हा परिषदेच्या ३१ आणि पंचायत समितीच्या ६३ जागांवर लढणार आहे. तर शिंदेसेना जिल्हा परिषदेच्या १९ आणि पंचायत समितीच्या ३४ जागांवर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचंही निवेदन आलं आहे. त्यांचंही समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागा आहेत. तर आठ तालुक्यांमधील पंचायच समित्यांच्या मिळून १०० जागा आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि आठ पंचायत पंचायच समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
Web Summary : Despite past clashes, BJP and Shinde Sena ally for Sindhudurg Zilla Parishad elections. BJP will contest 31 ZP and 63 Panchayat Samiti seats, while Shinde Sena will contest 19 ZP and 34 Panchayat Samiti seats. Elections are scheduled for February 5th.
Web Summary : पिछले संघर्षों के बावजूद, भाजपा और शिंदे सेना ने सिंधुदुर्ग जिला परिषद चुनावों के लिए गठबंधन किया। भाजपा 31 जिला परिषद और 63 पंचायत समिति सीटों पर चुनाव लड़ेगी, जबकि शिंदे सेना 19 जिला परिषद और 34 पंचायत समिति सीटों पर चुनाव लड़ेगी। चुनाव 5 फरवरी को निर्धारित हैं।