Sindhudurg Airport: चतुर्थीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण, चिपी विमनातळाच्या उदघाटनासाठी आता ७ ऑक्टोबरचा मुहुर्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 05:14 PM2021-09-04T17:14:25+5:302021-09-04T17:32:53+5:30

Sindhudurg Airport News: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.

Sindhudurg Airport: The dream of the servants to go to Konkan by plane on Chaturthi is still unfulfilled | Sindhudurg Airport: चतुर्थीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण, चिपी विमनातळाच्या उदघाटनासाठी आता ७ ऑक्टोबरचा मुहुर्त 

Sindhudurg Airport: चतुर्थीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण, चिपी विमनातळाच्या उदघाटनासाठी आता ७ ऑक्टोबरचा मुहुर्त 

Next

मुंबई - कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. (Sindhudurg Airport) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चतुर्थीला विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. आता चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी नवा मुहुर्त मिळाला असून, येत्या ७ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. (The dream of the servants to go to Konkan by plane on Chaturthi is still unfulfilled )

खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या या पत्रामध्ये ते लिहितात की, आपल्या मार्गदर्शनाने आणि आम्ही सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ आता प्रवासी विमान उड्डाण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अलायन्स एअर या विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीने ७ ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा  सुरू करण्याची तयारी असल्याचे पत्र विमान वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या दिवशी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

विनायक राऊत पुढे लिहितात की, आपल्या आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळाचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने योग्य ती पूर्वतयारी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही विनायक राऊत यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, विनायक राऊत यांच्या पत्रामुळे चिपी विमानतळाचे गणेशोत्सवापूर्वी उदघाटन करण्याचा मुहुर्त टळला आहे हे निश्चित झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला विमानाने कोकणात जाण्याचे स्वप्न यावर्षीही अपूर्णच राहणार हेही स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Sindhudurg Airport: The dream of the servants to go to Konkan by plane on Chaturthi is still unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app