शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:19 AM

मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ३८ ते ४२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे.

नवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला असून राज्यभर कांद्याची आवक घसरू लागली आहे. मुंबईतही आवक कमी होत असून दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ३८ ते ४२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे.राज्यात वर्षभरापासून कांदा दरामध्ये वारंवार चढउतार होऊ लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश सर्वच बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे. मुंबई बाजार समिती मध्येही एक आठवड्यापासून आवक कमी होऊ लागली असल्यामुळे दरामध्ये वाढ होत आहे. होलसेल मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यात कांदा २० ते २८ रुपये दराने विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये हे दर ३८ ते ४२ रूपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केमध्येही ५० रुपये दराने कांदा विकला जात आहे. पुढील किमान एक महिना कांदा दरामध्ये तेजी राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून आवक सुरळीत होण्यास किमान एक महिना लागू शकेल.- अशोक वाळुंज, संचालक,कांदा बटाटा मार्केटमुंबई बाजार समितीमधील प्रतिकिलो बाजारभावमहिना    बाजारभावडिसेंबर    २० ते २८जानेवारी    २६ ते ३१फेब्रुवारी    ३८ ते ४२राज्यातील बुधवारचे बाजारभाव पुढीलप्रमाणेबाजारसमिती    बाजारभावमुंबई             ३८ ते ४२कोल्हापूर    २० ते ५०सातारा    १५ ते ३८औरंगाबाद    १० ते ३९लासलगाव    १० ते ३९

टॅग्स :onionकांदा