आमीर खानकडून पठारावर श्रमदान
By Admin | Updated: April 11, 2017 01:17 IST2017-04-11T01:17:15+5:302017-04-11T01:17:15+5:30
अभिनेता आमीर खानसह पाणी फाउंडेशनची टीम सोमवारी सकाळी अचानकपणे नागझरी (ता. कोरेगाव) येथे आली. पठार नावाच्या शिवारात मातीनाल बंधारा

आमीर खानकडून पठारावर श्रमदान
रहिमतपूर (जि. सातारा) : अभिनेता आमीर खानसह पाणी फाउंडेशनची टीम सोमवारी सकाळी अचानकपणे नागझरी (ता. कोरेगाव) येथे आली. पठार नावाच्या शिवारात मातीनाल बंधारा कामाच्या ठिकाणी जाऊन आमीरने सहकाऱ्यांसह एक तास श्रमदान केले. टिकाव, खोरे, घमेले घेऊन माती खोदण्यापासून मातीचा भराव घालण्याचे काम या वेळी करण्यात आले.
पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या मातीनाल बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी आमीर खान आला होता. या वेळी पत्नी किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ उपस्थित होते. ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून पाणी साठवण्याच्या कामासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. नागझरी ग्रामस्थांची श्रमदानासाठी झालेली एकी पाहून मन भारावून गेले आहे. बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी साठवणुकीसाठी सुरू झालेल्या या मोहिमेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आमीरने या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)