मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाची अत्यंत महत्त्वाची चौकशी सुरू असून अहवाल येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आधीच सापडला असून सर्व आघाड्यांवर चौकशी सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शंका असतील तर त्या दूर होणे आवश्यकअजित पवार यांचे पुतणे आ. रोहित पवार यांनी विमान अपघाताबाबत व्यक्त केलेल्या शंकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या घटनेतील डीजीसीएची चौकशी महत्त्वाची आहे. रोहित पवार यांनी नेमके काय म्हटले आहे ते मी ऐकलेले नाही. मात्र, कोणालाही शंका असल्यास त्या दूर होणे आवश्यक आहे. यादृष्टीने तपास यंत्रणांनी अशाप्रकारच्या प्रकरणांत अपेक्षित असलेली चौकशी आधीच सुरू केली आहे. या अपघाताबाबत सविस्तर चौकशी व्हावी, यासाठी आपण सर्वप्रथम केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्या नागरी उड्डाण क्षेत्रातील त्रुटी किंवा उणीवांमधून काही शिकता आले तर त्या दुरूस्त करून सर्वसामान्य नागरिक आणि नेतेमंडळींसाठी ते अधिक सुरक्षित करता येईल, असेही ते म्हणाले.
Web Summary : CM Fadnavis urges patience pending the DGCA report on the Ajit Pawar plane crash. Investigation is underway, including the 'black box' analysis. He emphasized addressing any concerns and improving air travel safety.
Web Summary : सीएम फडणवीस ने अजित पवार विमान दुर्घटना पर डीजीसीए की रिपोर्ट का इंतजार करने का आग्रह किया। 'ब्लैक बॉक्स' विश्लेषण सहित जांच जारी है। उन्होंने किसी भी चिंता को दूर करने और हवाई यात्रा सुरक्षा में सुधार पर जोर दिया।