शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की...", अमित शाहांच्या भेटीवरून एनसीपी-एसपीची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 16:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाने आधीच २० जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. राहिलेल्या २८ जागांमध्येही काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील महायुतीत सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. यातच आज राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेचा महायुतीमधील सहभाग जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी..., असा टोलाही एनसीपी-एसपीने लगावला आहे.

दरम्यान, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत काय ठरले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात येऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेतात, महायुतीत जातात की मोदी सरकारविरोधात बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे,भाजपाने राज्यात आधीच २० जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. उर्वरित २८ जागांमध्येही काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी, शिवसेनेला मनसेसाठी एखादी जागा सोडावी लागू शकते, अशी शक्यता आहे. तसेच, राज ठाकरे महायुतीत सामील झाल्यास उद्धव ठाकरेंच्या गटासोबत लढत देणे भाजपाला सोपे जाऊ शकते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाMNSमनसे