CoronaVirus: कोरोनामुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये; मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या लाटेवरून उद्योजकांना 'इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:12 PM2021-06-06T17:12:01+5:302021-06-06T17:13:51+5:30

CM Uddhav Thackeray address to Businessman of Maharashtra on covid: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि उद्योगांची काळजी घेण्याच्या सूचना केली.

should not be knocked down in Maharashtra; CM Uddhav Thackeray appeals businessman on Corona | CoronaVirus: कोरोनामुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये; मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या लाटेवरून उद्योजकांना 'इशारा'

CoronaVirus: कोरोनामुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये; मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या लाटेवरून उद्योजकांना 'इशारा'

Next

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना केले आहे. (CM uddhav Thackeray told businessman's, what to do in Corona crisis with employees)


अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. साप भी मरे और लाठी भी ना तुटे, असे आपल्याला वागावे लागेल. युकेतील विषाणू सारखा किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत. पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या  राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी. पावसाची सुरुवात होते आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपल्या कामगार आणि कर्मचारी यांना आरोग्याचे नियम पाळतील असे पहा. आरोग्य तपासण्या कराव्यात. बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग पसरणार नाही हे पहा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. 


येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या  तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असे आवाहन ठाकरे यांनी उद्योजकांना केले आहे. 

Web Title: should not be knocked down in Maharashtra; CM Uddhav Thackeray appeals businessman on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.