शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:09 IST

Foxconn HCL Project: फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले

Foxconn HCL Project: वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची परिस्थिती दिसत आहे. या कंपनीसंदर्भात महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला हलवल्याचा आरोप केला जात होता. फॉक्सकॉन ही परदेशी सेमीकंडक्टर कंपनी आहे. ही कंपनी देशातील वेदांता कंपनीसोबत सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट बनवणार होती. सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. पण नंतर तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा आरोप आला. गुजरातमधील प्रकल्प रद्द झाल्यावर फॉक्सकॉन HCL सोबत हा प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशला हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे.

"महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ हजार ७०६ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून उत्तर प्रदेशातील २ हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आधी महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरात देऊन गुटगुटीत केले, आता उत्तर प्रदेशला पुरवले जात आहे. एक काळ होता लोक महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी यायचे. आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या असं सरकारला वाटत आहे का?" असा संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे.

दरम्यान, वेंदाता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातमध्ये यशस्वीपणे होऊ शकला नाही. कारण फॉक्सकॉन आणि वेदांता समूहामध्ये जो संयुक्त उद्यम होणार होता, तो ब्रेक झाला. वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर फॉक्सकॉनने आता HCL सोबत प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

  • जेवरमध्ये उभारण्यात येणाऱ्या फॉक्सकॉन-HCLच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ३७०६ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
  • प्रकल्पातून २००० नागरिकांना रोजगार मिळणार आहे.
  • प्रत्येक महिन्याला ३.६ कोटी डिस्प्ले ड्राईवर चिपचे उत्पादन होणार आहे. ही चिप मोबाईलच्या डिस्प्लेसाठी आवश्यक असते.
टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेUttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात