शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:25 IST

"तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते."

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रमही सुरू आहे. मात्र, यातच राज्यात लशींचा तुटवडा होत असल्याची तक्रार राज्यातील ठाकरे सरकारने केंद्राकडे केली आहे. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर 'महावसुली' आघाडी सरकार म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (The shortage of vaccines in the state is a crisis created by the State government says BJP) 

या व्हिडिओत उपाध्ये यांनी म्हटले आहे, की "राज्यात निर्माण झालेला कोरोना लशींचा तुडवडा हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट आहे. खरे तर, या सरकारने हिशेब द्यायला हवा, की लसीकरण सुरू झाल्यापासून जे पात्र आहेत, त्यांनाच लशी दिल्या गेल्या, की जे निकशात बसत नव्हते त्यांनाही लशी दिल्या गेल्या. काही खास लोकांना, काही लाडक्या लोकांना लशी दिल्या गेल्यात का? नियम मोडून काही लशी दिल्या गेल्यात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत," असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

या शिवाय, तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते. गेल्या दोन-तीन महिन्यांत लसिकरण झाल्यापासून लशी नेमक्या कुणाला दिल्या? याचा हिशेब महाराष्ट्र सरकारने द्यायला हवा, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या