शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

आराेग्य विभागात १५ हजार कर्मचाऱ्यांचा तुटवडा, रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:42 IST

health department : विद्यमान कार्यरत तसेच कंत्राटी स्वरूपात सामावून घेतलेल्यांच्या भरवशावर लढाई सुरू होती. मात्र, कंत्राटींची सेवाही आता खंडित करण्यात आली आहे.

- विलास गावंडे 

यवतमाळ : ग्रामीण आरोग्याचा डोलारा सांभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांचा राज्यात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गट-ड आणि क मधील १५ हजार ४९० पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवताप, कुष्ठरोग विभागातील या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असून सर्वाधिक ३ हजार २९१ रिक्त पदे हिवताप व जलजन्य रोग सहसंचालक आरोग्यसेवा (पुणे-६) या कार्यालयात रिक्त आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.

विद्यमान कार्यरत तसेच कंत्राटी स्वरूपात सामावून घेतलेल्यांच्या भरवशावर लढाई सुरू होती. मात्र, कंत्राटींची सेवाही आता खंडित करण्यात आली आहे. एवढी गंभीर स्थिती असतानाही आरोग्य विभागात रिक्त पदांच्या अनुशेषाबाबत कमालीची उदासीनता आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, लॅब टेक्निशिअन, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, लिपिक या महत्त्वपूर्ण पदांची भरती झालेली नसल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच आहे.

कार्यक्रम प्रमुख आणि आरोग्यसेवा प्रभारी मंडळांमध्ये रिक्त जागांची लांबलचक यादी आहे. या विभागासाठी एकूण ३१ हजार ५४६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २१ हजार २० कर्मचारी कार्यरत आहेत. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गट-क संवर्गातील दहा हजार ५२६ जागा रिक्त आहेत. उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळासाठी तीन हजार ४३ पदे मंजूर असताना केवळ १७८५ कर्मचारी कार्यरत आहेत. १२५८ जागा या विभागात रिकाम्या आहेत. उपसंचालक अकोला मंडळात २६८१ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १८६० कार्यरत असून ८२१ जागा रिक्त आहेत. याशिवाय लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे मंडळांसह उपसंचालक आरोग्यसेवा कार्यालयांमध्येही रिक्त पदांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

परिचरांच्या पाच हजार जागा रिकाम्यागट-ड संवर्गातील परिचर, शिपाई अशी चार हजार ९१४ पदे सद्यस्थितीत रिकामी आहेत. या संवर्गात १३ हजार ११० पदांना मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात आठ हजार १९६ कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वाधिक ७१२ जागा उपसंचालक आरोग्यसेवेच्या नाशिक मंडळ कार्यालयात रिक्त आहेत. या ठिकाणी मंजूर असलेल्या १८४० कर्मचाऱ्यांपैकी ११२७ लोक कार्यरत आहेत. आरोग्यसेवा संचालक मुंबई, हिवताप व जलजन्य रोग सहसंचालक पुणे, उपसंचालक ठाणे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर मंडळाला रिक्त पदांनी पोखरले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्र