शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

थोडक्यात हुकलो साहेब.... लोकसभा निवडणुकातील निसटते 'जय-पराजय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 06:23 IST

अपक्षांचा खेळ चाले; फक्त १३ झाले खासदार, पण अनेकांना केले पराभूत !

प्रेमदास राठोड

कोणत्याही निवडणुकीत अनेक अपक्ष स्पर्धेतील उमेदवारांचा खेळ करतात. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही यास अपवाद नाहीत. आजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून ३ हजार ९७९ अपक्षांनी भाग्य अजमावले. त्यांनी २ कोटी ५१ लाख मते (६.५५ टक्के) घेतली. एकूण १३ अपक्ष लोकसभेत पोहोचले, ६२ जणांनी अनामत रक्कम राखली, तर ११९ जणांना १० टक्क्यांवर मते मिळाली. उर्वरित ३ हजार ८६० अपक्षांना धड १० टक्के मतेही मिळाली नाहीत. १६ पैकी ८ निवडणुकांमध्ये एकाही अपक्षाला यश मिळाले नाही. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत तर महाराष्ट्रात सर्व ४४६ अपक्षांची अनामत जप्त झाली. आजवरच्या निवडणुकीत ५० जणांनी दुसऱ्या स्थानापर्यंत धडक दिली. १८४ जण तिसऱ्या स्थानावर होते. ३१९ जण चौथ्या स्थानापर्यंत पोहोचले तर ३२२ पाचव्या क्रमांक होते. आजवरच्या निवडणुकीत सर्वाधिक ६० उमेदवार १९९६ च्या निवडणुकीत नागपुरात उभे होते. त्यात ४६ अपक्ष होते. त्यावेळी पहिले ३ वगळता उर्वरित ५७ जणांना धड एक टक्काही मते मिळाली नव्हती. आजवरच्या निवडणुकीत दारून पराभव पत्करलेल्या अनेक अपक्षांनी अनेकांचे खेळ मात्र अगदी सहजपणे बिघडवले.

विजयी झालेले १३ अपक्ष: सदाशिवराव मंडलिक (कोल्हापूर, २००९), रामदास आठवले (पंढरपूर, १९९९), मोरेश्वर सावे (औरंगाबाद, १९८९), अशोक देशमुख (परभणी, १९८९), वामनराव महाडिक (मुंबई दक्षिण-मध्य, १९८९), दत्ता सामंत (मुंबई दक्षिण-मध्य, १९८४), के.एम. कौशिक (चंद्रपूर, १९६७), लाल शमशाह (चंद्रपूर, १९६२), बापूजी अणे (नागपूर, १९६२), बापू कांबळे (कोपरगाव, १९५७), रघुनाथ खाडिलकर (अहमदनगर, १९५७), जयवंत मोरे (सोलापूर, १९५७) आणि बाळासाहेब खर्डेकर (कोल्हापूर कम सातारा, १९५१).पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात अपक्षांचे प्रमाण २२ टक्के होते. पुढे १९८४ मध्ये ते चक्क ७६ टक्क्क््यांवर पोहोचले. त्यावेळी ४९८ उमेदवारांपैकी ३७७ अपक्ष होते. नंतरच्या दोन निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण कमी झाले. पण १९९६ मध्ये पुन्हा एकदा ते ७६ टक्क्क््यांवर पोहोचले. त्यावेळी राज्यात आजवरचे सर्वाधिक एकूण १०६४ उमेदवार रिंगणात होते. १९६२ नंतर अपक्षांचे सर्वांत कमी प्रमाण १९९९ मध्ये ३० टक्के होते. २०१४ मध्ये रिंगणातील ८९७ पैकी ४४४ उमेदवार अपक्ष होते.

आजवर केवळ अपक्षांमुळे निवडणुकीत पराभूत झालेल्यांची संख्या मोठी आहे. यात काही निसटता पराभव पाहिलेल्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. सुभाष वानखेडे (हिंगोली २०१४), सुनील तटकरे (रायगड, २०१४), किरीट सोमय्या (मुंबई उत्तर पूर्व, २००९), डॉ. कल्याण काळे (औरंगाबाद, २००९), प्रफुल्ल पटेल (भंडारा, २००४), लक्ष्णराव ढोबळे (उस्मानाबाद, २००४), उज्ज्वाताई सुशीलकुमार शिंदे (सोलापूर, २००४), पांडुरंग फुंडकर (अकोला, १९९९), गुरुदास कामत (मुंबई उत्तर पूर्व, १९९९), हंसराज अहिर (चंद्रपूर, १९९९), अनंत तरे (कुलाबा, १९९६), दादासाहेब रुपवते (मुंबई दक्षिण-मध्य, १९९१), उत्तमराव राठोड (हिंगोली, १९९१), शरद दिघे (मुंबई उत्तर-मध्य, १९८९), प्र.के. अत्रे (मुंबई मध्य, १९६७). हे सर्व जेवढ्या मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा जास्त मते त्यावेळी अपक्षांनी घेतली होती.गेल्या निवडणुकीत हिंगोलीत राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले. यापेक्षा जास्त मते त्यावेळी रिंगणातील १० अपक्षांनी घेतली होती. रायगडात गेल्यावेळी सर्व पराभूत उमेदवारांना विजयी अनंत गीता यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते होती.

गेल्या निवडणुकीत (२०१४) हिंगोलीत काँग्रेसचे राजीव सातव यांचा १६३२ एवढ्या मतांनी निसटता विजय झाला होता. रायगडातून जिंकलेले अनंत गीते यांचे मताधिक्य २११० एवढे अत्यल्प होते.

टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक