शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर; ड्राय रनला नियोजनाचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 6:46 AM

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता

सोमनाथ खताळ

बीड : कोरोना लसीकरण सुरू करण्यापूर्वी ड्राय रन घेतला. यात केवळ नियोजनाचा देखावा दिसला. प्रत्यक्षात ढिसाळ कारभार असल्याचे शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालयात दिसले. लस घेतलेल्या आशा, अंगणवाडीताईंना निरीक्षण कक्षात चक्क जमिनीवर बसविण्यात आले. तसेच येथे कोरोनाच्या कसल्याच नियमांचे पालन केले नसल्याचेही दिसले.   

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता. यात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यात आले होते. असेच नियोजन प्रत्यक्ष लसीकरणात होणार होते. परंतु शुक्रवारी आढावा घेतला असता वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली.

दुपारनंतर मिळाल्या खुर्च्या‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना संपर्क केला. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीत्ते यांना भेट देण्यास सांगितले. दुपारनंतर परिस्थिती बदललेली दिसली. खाली बसणाऱ्यांना खुर्च्या तर निरीक्षण कक्षांची संख्याही वाढविण्यात आली.

डॉक्टरांना खुर्च्या, ‘आशां’ना दुजाभाव का?कोरोनाकाळात डॉक्टर, परिचारिकांनी जेवढा जीव धोक्यात घालून काम केले, तसेच आशाताई, अंगणवाडी सेविका यांनीही सर्वेक्षण, नोंदणी अशी विविध कामे केलेली आहेत. त्या सुद्धा काेरोना योद्धा आहेत. परंतु लसीकरण केंद्रात दुजाभाव केल्याचे दिसले. डॉक्टरांना बसायला खुर्च्या दिल्या जातात, परंतु आशांना जमिनीवर बसविण्यात आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या