धक्कादायक! चंद्रभागा नदीत बुडून तिघींचा मृत्यू; पंढरपुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:49 IST2025-07-19T12:47:39+5:302025-07-19T12:49:52+5:30

Three women drown in Chandrabhaga river: पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली.

Shocking; Three women drown in Chandrabhaga river; Unfortunate incident in Pandharpur | धक्कादायक! चंद्रभागा नदीत बुडून तिघींचा मृत्यू; पंढरपुरातील दुर्दैवी घटना

धक्कादायक! चंद्रभागा नदीत बुडून तिघींचा मृत्यू; पंढरपुरातील दुर्दैवी घटना

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. या तीन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, संगीताबाई संजू सपकाळ (वय ४२), सुनीताबाई महादू सपकाळ (वय ३८) अशा मृत महिलांची नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भोकरदन तालुक्यातील  धावडा या गावातील महिला पंढरपूर येथील विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या तिघी पुंडलिक मंदिर शेजारी असलेल्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघी बुडाल्या.  या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Shocking; Three women drown in Chandrabhaga river; Unfortunate incident in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.