धक्कादायक : नर्सकडून सहा दिवसाच्या मुलीचे बोटच कापले गेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 14:13 IST2019-10-18T14:09:37+5:302019-10-18T14:13:00+5:30
सोलापूर शासकीय रूग्णालयातील प्रकार; कुटुंंबियांकडून नर्सला मारहाण केल्याचा आरोप

धक्कादायक : नर्सकडून सहा दिवसाच्या मुलीचे बोटच कापले गेले !
सोलापूर : सहा दिवसाच्या नवजात मुलीला लावण्यात आलेली सलाईनची सुई काढताना नर्सच्या हातून मुलीचे बोट कापले गेले. ही धक्कादायक घटना सोलापुरातील शासकीय रूग्णालयात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.
तहसीन रिजवान इटकळे (वय २१, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) या महिलेने सहा दिवसापूर्वी मुलीला शहर शासकीय रूग्णालयात जन्म दिला होता. उपचार चालू असताना या नवजात मुलीच्या हातातील सलाईनची सुई काढताना नर्सच्या हातून मुलीचे बोट कापले गेले. 'रक्त पाहून याबाबत विचारणा केली असता गप्प बसा. तुम्हाला कळते की आम्हाला ?' अशी प्रत्युत्तरे संबंधितांकडून दिल्याची माहिती तहसीनने 'लोकमत'शी बोलताना सांगितली. सध्या ही मुलगी आतील विभागात उपचारासाठी ठेवली असून रात्रीपासून आईला बघायलाही मिळाली नाही, असेही या कुटुंबानं सांगितलं.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित नर्सला मुलीच्या कुटुंंबियांनी मारहाण केल्याचा आरोपही संबंधित नर्स व तेथील कर्मचाऱ्यांनी ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीशी केला.