शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

धक्कादायक वास्तव; वऱ्हाडात दहा महिन्यांत ९२८ शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:51 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.

अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतक-यांच्या संघर्षावर नैराष्य भारी पडत आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा आॅक्टोबर महिन्यापर्यंत ९२८ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. दर दिवशी तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगावं कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आॅक्टोबर २०१८ पर्यंत १५ हजार ६२९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ८ प्रकरणे पात्र, आठ हजार ४०६ अपात्र, तर २१५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्देवी आहे. २००१ मध्ये ५२ प्रकरणे होती. २०१६ मध्ये १२३५, तर गतवर्षी ११७६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात  ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४, जून ८६, जुलै ८९, आॅगस्ट १०६, सप्टेंबर १०४ व आॅक्टोबर महिन्यात १०३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. 

१७ वर्षांत १५,६२९ शेतकरी आत्महत्यागेल्या १७ वर्षांत विभागासह वर्धा जिल्ह्यात १५,६२९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागात १३ हजार ९९८ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३,५२५, अकोला २,१९९, यवतमाळ ४,१५९, बुलडाणा २,६४०, वाशिम १,४७५ व वर्धा जिल्ह्यात १,६३१ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

शेतकरी स्वावलंबी मिशन कुचकामीराज्यात शेतकरी आत्महत्याप्रवण असणा-या १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी पुनर्रचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी