धक्कादायक; लग्नानंतर वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:11 IST2019-05-15T14:06:26+5:302019-05-15T14:11:44+5:30

माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभागाचे माजी संचालक गंगाधर म्हमाणे याचा तो मुलगा होता

Shocking Engineer death in 20 days after marriage | धक्कादायक; लग्नानंतर वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू

धक्कादायक; लग्नानंतर वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू

ठळक मुद्दे- अवघ्या वीस दिवसात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ- माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभागाचे माजी संचालक गंगाधर म्हमाणे तो मुलगा होता- मयत श्रीशैल याचे २४ एप्रिल रोजी विवाह झाला होता

सोलापूर : लग्नानंतर अवघ्या वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सोलापुरात घडली आहे. श्रीशैल गंगाधर म्हमाणे (रा. शेटेवस्ती, सोलापूर, मुळगाव - कोरवली ता़ मोहोळ) असे मरण पावलेल्या अभियंत्याचे नाव आहे. माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे याचा तो मुलगा होता.

दरम्यान, मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने श्रीशैल यास मंगळवारी सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीला सुज येऊन मुत्राशयात जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असताना बुधवारी ते मरण पावले. लग्नानंतर आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  मयत श्रीशैल याचा विवाह २४ एप्रिल रोजी सोलापुरातील एका मंगल कार्यालयात झाले होते.


 

Web Title: Shocking Engineer death in 20 days after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.