भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:31 PM2024-01-24T19:31:57+5:302024-01-24T20:11:16+5:30

रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Shock to Bharat Gogawale; Aditi Tatkare as Guardian Minister of Raigad? The flag will be hoisted by them! | भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला. त्यानंतर शिंदे गटातील अनेक इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. याच नाराजीतून अजूनही काही जिल्ह्यांना पूर्णवेळ पालकमंत्री मिळालेले नाही. दरम्यान, भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या शुक्रवार म्हणजेच २६ जानेवारी २०१४ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाचवेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाने येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहन करणाऱ्या मंत्री, पालक मंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मध्ये रायगडचे ध्वजारोहण हे मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाची आस लावून बसलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. 

रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या २६ जानेवारीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. मागील वेळी हाच ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला होता. सध्या उदय सामंत यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. मात्र, ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने तिथे ध्वजारोहण करणार आहे. मागील वेळीही त्यांनी रत्नागिरी येथे ध्वजारोहण केले होते आणि रायगडमध्ये तेथील जिल्हाधिऱ्यांनी केले होते. मात्र, यावेळी रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान,  मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता, यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय, अर्धशासकीय समारंभ आयोजित करून नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल, त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेच्यापूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. 

कोण कुठे ध्वजारोहण करणार? 
- मुंबई येथील शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. 

- विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पुढील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, मंत्री ध्वजारोहण करतील.
देवेंद्र फडणवीस- नागपूर, 
अजित पवार- पुणे, 
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, 
सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, 
दिलीपराव वळसे पाटील- बुलढाणा, 
डॉ. विजयकुमार गावित- भंडारा, 
हसन मुश्रीफ- कोल्हापूर, 
अब्दुल सत्तार- हिंगोली, 
चंद्रकांत पाटील- सोलापूर, 
गिरीश महाजन- धुळे, 
सुरेश खाडे- सांगली, 
तानाजी सावंत- धाराशीव, 
उदय सामंत- रत्नागिरी, 
दादाजी भुसे- नाशिक, 
संजय राठोड- यवतमाळ, 
गुलाबराव पाटील- जळगाव, 
संदिपान भुमरे- छत्रपती संभाजीनगर, 
धनंजय मुंडे- बीड, 
रवींद्र चव्हाण- सिंधुदुर्ग, 
अतुल सावे- जालना, 
शंभूराज देसाई- सातारा, 
मंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगर, 
धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया, 
संजय बनसोडे- लातूर, 
अनिल पाटील- नंदुरबार, 
दीपक केसरकर- ठाणे, 
आदिती तटकरे- रायगड.

- इतर विभागीय आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, तथापि राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी.  तसेच संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. 

- राज्यात या दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारावेत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 
 

Web Title: Shock to Bharat Gogawale; Aditi Tatkare as Guardian Minister of Raigad? The flag will be hoisted by them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.