शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पुढील आर्थिक वर्षी वीज दरवाढीचा शॉक : एप्रिलपासून ३ टक्के दरवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:00 PM

केवळ यावर्षीच नव्हे तर, पुढील आर्थिक वर्षांत (२०१९-२०) देखील ग्राहकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देपुढच्या आर्थिक वर्षांत सव्वाबारा हजार कोटींची वाढयंदाच्या आर्थिक वर्षात मात्र, ३ टक्के दराने बिलात वाढ होणार

पुणे : केवळ यावर्षीच नव्हे तर, पुढील आर्थिक वर्षांत (२०१९-२०) देखील ग्राहकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नियामक मत्ता अंतर्गत सव्वाबारा हजार कोटी रुपयांच्या वीजदरवाढीला परवानगी दिली आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मात्र, ३ टक्के दराने बिलात वाढ होईल. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या मध्यावधी फेरयाचिकेवर १२ सप्टेंबर २०१८ रोजी आदेश दिला. त्यानुसार १ एप्रिल २०१९पासून ३ टक्के दराने वीज बिलात वाढ होणार आहे. बहुवर्षीय वीज दर विनियम २०१५ नुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३ नोव्हेंबर २०१६ रोजी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंतच्या वीजदराचा आदेश दिला होता. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१८-१९ व १९-२० साठी वीजदरात सुधारणा करण्यात आली. त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०१८ पासून करण्यात आली. पुढील टप्प्यात आर्थिक वर्ष २०१९-२० साठी येत्या १ एप्रिल पासून सुधारीत दर लागू होत आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी पाचशे युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात आर्थिक वर्ष २०१८-१९च्या तुलनेत सरासरी केवळ तीन एवढीच वाढ झालेली आहे. घरगुती ग्राहकांच्या स्थिर आकारात १० रुपये प्रति महिना एवढीच वाढ असून सरासरी, वीजदरात १७ ते ३१ पैसे प्रति युनिट म्हणजेच केवळ तीन टक्के दरवाढ होत असल्याचे सांगण्यात आले. ----------------अशी करण्यात आली वीज दरवाढ 

 आयोगाने ८ हजार २६८ कोटी रुपयांची वाढ आर्थिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या वर्षांसाठी मंजूर केली. आर्थिक वर्ष २०१८-१९साठी ६.६३ रुपये प्रति युनिट इतका सरासरी वीजदर मंजूर केला आहे. तर आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ६.८५ रुपये प्रति युनिट इतका सरासरी वीजदर मंजूर केला आहे. या शिवाय आयोगाने या वीजदर आदेशात १२,३८२ कोटी रुपयांचा ह्यनियामक मत्ताह्ण आकारण्यास मंजुरी दिली आहे. त्याची वसुली २०२०-२१ या आर्थिक वषार्पासून केली जाणार आहे. ----------------------लघुदाब ग्राहक    २०१८-१९    २०१९-१०     प्रतियुनिट दरवाढ पैशांमध्ये ०-१०० युनिट    ५.३१        ५.४८           १७ १०१-३००    ८.९५        ९.२६           ३१३०१-५००     ११.५७        ११.७५           १८

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणGovernmentसरकार