शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कायम तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे जेव्हा फडणवीसांचं कौतुक करतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 22:08 IST

जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे.

मुंबई: शिवसेना-भाजपा या 'मित्र'पक्षांमधील मैत्री सर्वश्रुत आहे. गेल्या चार वर्षांपासून या दोन पक्षांची 'मैत्री' संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री कायम राज्याच्या हिताला प्राधान्य देतात. एक व्यक्ती म्हणून मी नेहमी त्यांच्यासोबत असेन, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याचा पश्चात्ताप होतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना कृतज्ञता सन्मान द्यायचा असल्यास तो कोणत्या कारणासाठी द्याल, असा प्रश्न यावेळी उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर पुरस्कार मुख्यमंत्र्यांना पुरस्कार द्यायचा आहे की देवेंद्रजींना, असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी केला. यावर मुलाखतकर्त्यांनी देवेंद्रजींना कोणत्या कारणासाठी पुरस्कार द्याल, असा प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं. 

देवेंद्रजी हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांचा स्वभाव अतिशय मनमोकळा आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली. 'राजकारण करताना आम्ही अनेकदा राजकारणाच्या पलीकडे असलेल्या गोष्टी करतो. एखाद्या गोष्टीवर एकमत झालं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी त्या गोष्टी लगेच मार्गी लावतात. राज्याच्या हिताला ते प्राधान्य देतात,' असं म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांची मुक्तकंठानं स्तुती केली. 'जेव्हा देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आलं, तेव्हा मी त्यांना लगेच पाठिंबा दिला. कारण तरुण आणि प्रामाणिक चेहरा आहे. ते त्या पद्धतीनं काम करत आहेत. व्यक्ती म्हणून कायम मी त्यांच्यासोबत असेन,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र