शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:53 IST

पक्षचिन्हाबाबतही झाला महत्त्वाचा निर्णय

Shivsena Symbol and Name, Election Commission: राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विषयावर आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे नव्या नावांचे आणि चिन्हाचे पर्याय दिले होते. त्यापैकी, उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' असे नाव देण्यात आले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच या संबधी निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. याशिवाय, उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाने दावा केलेल्या तीनही पक्षचिन्हांवर निवडणूक आयोगाने नकारघंटा दिली. त्यांनी आता उद्या दुपारपर्यंत, नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे.

ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!

निवडणूक आयोगाकडे प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर शनिवारी निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात होता. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे ३ चिन्हे आणि ३ नावांचे पर्याय दिले. त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला नाव आणि चिन्हे दोन्हीबाबत हिरवा कंदील मिळाला. ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने आणि मशाल या चिन्हावर निवडणूक लढेल. पण शिंदे गटाने दिलेली तीनही चिन्हे निवडणूक आयोगाने बाद ठरवत, ११ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालेले शिंदे गट कोणत्या चिन्हाचा पर्याय देतो, त्याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे