Sanjay Raut : "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही"; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:17 PM2022-07-31T18:17:20+5:302022-07-31T18:26:07+5:30

ShivSena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde : संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यावर प्रतिक्रिया देताना "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही" असं म्हटलं आहे.

ShivSena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Over ED Raid Statement | Sanjay Raut : "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही"; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Sanjay Raut : "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही"; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

googlenewsNext

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (ShivSena Sanjay Raut ) यांच्या भांडूपमधल्या मैत्री निवासस्थानी आज ईडीचे पथक दाखल झाले. सकाळपासून राऊतांची चौकशी सुरू होती. यानंतर आता ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं आहे. या चौकशीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. 'राऊतांची चौकशी सुरू आहे, त्यांना अटक होणार की नाही हे मला माहीत नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. कर नाही, त्याला डर कशाला. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, काय व्हायचं ते होऊद्या' असं म्हटलं होतं. यावरून आता संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) टोला लगावला आहे. 

संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यावर प्रतिक्रिया देताना "करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच "काही जण म्हणतात कर नाही, त्याला डर कशाला... आम्हाला करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही" असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "जी काही कारवाई व्हायची ते होऊद्या. मी काही घाबरत नाही. राजकीय सुडाने चाललेला खेळ आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, निधड्या छातीने आम्ही सामोर जातो. राजकीय सुडाने या कारवाया सुरू आहेत. त्यांना बळ मिळणार नाही. अशा कारवाईच्या भीतीने काही लोक पक्ष सोडतात, संजय राऊत त्यातले नाहीत. मरेन पण झुकणार नाही, पक्ष सोडणार नाहीय, शिवसेना सोडणार नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 "...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

"कोणतेही कागदपत्र माझ्याकडे सापडले नाहीत. पत्रा चाळ कुठे हे मला माहीत नाही, माझा आवाज बंद करायचा, शिवसेनेला संपवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही. शिवसैनिकांना लढण्यासाठी बळ मिळणार असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे."

"माझ्यावर कसा दबाब आणला जातो, खोट्या प्रकरणात कसं अडकवलं जाईल हे सांगणारं एक पत्र व्यंकय्या नायडू यांना सहा महिन्यांआधी दिल होतं. भविष्यात मी आत असेन की बाहेर असेन माहीत नाही... याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल धुलाई काय असते" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

Web Title: ShivSena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Over ED Raid Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.