शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Sanjay Raut : "...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 18:24 IST

ShivSena Sanjay Raut : "जी काही कारवाई व्हायची ते होऊद्या. मी काही घाबरत नाही. राजकीय सुडाने चाललेला खेळ आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे."

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (ShivSena Sanjay Raut) यांना तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने आता ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. यानंतर आता ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

"जी काही कारवाई व्हायची ते होऊद्या. मी काही घाबरत नाही. राजकीय सुडाने चाललेला खेळ आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, निधड्या छातीने आम्ही सामोर जातो. राजकीय सुडाने या कारवाया सुरू आहेत. त्यांना बळ मिळणार नाही. अशा कारवाईच्या भीतीने काही लोक पक्ष सोडतात, संजय राऊत त्यातले नाहीत. मरेन पण झुकणार नाही, पक्ष सोडणार नाहीय, शिवसेना सोडणार नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"कोणतेही कागदपत्र माझ्याकडे सापडले नाहीत. पत्रा चाळ कुठे हे मला माहीत नाही, माझा आवाज बंद करायचा, शिवसेनेला संपवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. शिवसैनिकांना लढण्यासाठी बळ मिळणार असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे. करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही. माझ्यावर कसा दबाब आणला जातो, खोट्या प्रकरणात कसं अडकवलं जाईल हे सांगणारं एक पत्र व्यंकय्या नायडू यांना सहा महिन्यांआधी दिल होतं. भविष्यात मी आत असेन की बाहेर असेन माहीत नाही... याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन तेव्हा भारतीय जनता पक्षाला कळेल धुलाई काय असते" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. ते मला अटक करत आहेत, मी अटक व्हायला तयार आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय