Kishori Pednekar : "पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 16:14 IST2022-09-30T16:06:13+5:302022-09-30T16:14:05+5:30
Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Kishori Pednekar : "पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर
दसरा मेळाव्यावरून भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. "दसरा मेळाव्यासाठी मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत" असं म्हणत हल्लाबोल केला. "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?" असा खोचक सवाल भाजपाने विचारला. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार" असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी भाजपाला रोखठोक उत्तर दिलं आहे. "पेंग्विन सेनेची तुम्ही काळजी करू नका, मुंबईत ती उत्तम काम करतेय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लोक धन्यवाद देतात कारण परदेशात जाऊन जे सुख पाहायला मिळतं, ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं" असं म्हणत पेडणेकरांनी भाजपाच्या राम कदमांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.
"पेंग्विननेच भरभराट केलीय"
"तुम्ही काहीही म्हणा... पेंग्विननेच भरभराट केलीय, ती पेंग्विन सेना महाराष्ट्राची आणि मुंबईची भरभराट करणार" असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. राम कदम यांनी "महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत... आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"दसरा मेळाव्यासाठी मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत" #BJP#RamKadam#Shivsena#UddhavThackeray@ramkadamhttps://t.co/vj4twmrSpG
— Lokmat (@lokmat) September 30, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"