शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व

By admin | Updated: April 1, 2015 02:24 IST

राजकीय वादात आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह इतर महत्त्वाच्या पाच विशेष समिती सदस्यांची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली.

ठाणे : राजकीय वादात आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह इतर महत्त्वाच्या पाच विशेष समिती सदस्यांची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. तसेच स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवडही या वेळी करण्यात आली. या सर्व समित्यांवर शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. तर काँग्रेसने सर्वच समित्यांमध्ये महिलांना प्राधान्य दिले.महापालिकेत मागच्या दाराने प्रवेश करणाऱ्यांच्या नावांची घोषणा सोमवारीच झाली होती. त्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती. त्यानुसार मंगळवारी शिवसेनेतून राम आणि विकास रेपाळे, राष्ट्रवादीतून मनोज प्रधान, काँग्रेसमधून प्रदीप राव आणि रिपाइं एकतावादीतून नागसेन इंदिसे यांची निवड झाली. तर स्थायी समितीतून मंगळवारी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, संजय मोरे, संजय भोईर, अशोक वैती, गिरीश राजे आणि नारायण पवार, नजीब मुल्ला हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आता शिवसेनेतून मधुकर पावशे, एकता भोईर, अनिता बिर्जे, बालाजी काकडे यांची तर काँग्रेसमधून मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीतून नजीब मुल्ला यांची पुन्हा वर्णी लागली. त्यांच्या जोडीला योगेश जाणकर यांची तर मनसेतून राजश्री नाईक यांची निवड झाली आहे. काँग्रेसने स्वीकृत आणि स्थायी समिती वगळता इतर पाच विशेष समित्यांवर रेश्मा पाटील, असिया कुरेशी, मेघना हंडोरे, साजिया अन्सारी आणि साजिया कुरेशी या पाच महिलांची निवड केली आहे. शिवसेनेत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. त्यामुळे अनेक निष्ठावंतांत नाराजीची भावना आहे. (प्रतिनिधी)