शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:32 IST

Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंचीशिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालामधून कुठलाही पक्ष हा खासगी मालमत्ता होऊ शकत नाही, हे अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी घडल्या  आहेत. त्यामुळे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे आणखी काही आमुलाग्र परिवर्तन होईल, असं नाही. खरंतर शिवसेना ज्या कारणामुळे तुटली आहे. त्याचं कारण मागच्या दशकभरातील भाजपाच्या विस्तारवादी धोरणात आहे. मुंबई-ठाणे आणि कोकणपट्ट्याबाबेर शिवसेनेपासून भ्रमनिरास झालेल्या मतदारांना आपल्याकडे खेचले आहे. मुंबई-पुणे -नाशिक आदी शहरी भागांसह विदर्भ मराठवाड्यामधील शिवसेनेच्या मतदारालाही आपल्याकडे वळवण्यात भाजपा यशस्वी झाला  आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

दरम्यान, भाजपाचं हे विस्तारवादी धोरण सध्या भाजपासोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरू शकतं. आधीच अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटामधील युतीची कालमर्यादा ही अजित पवार गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार चालवण्याबाबत भाजपाच्या विश्वासावर अवलंबून आहे.

तसेच छोट्या पक्षांसोबत भाजपाची ज्याप्रकारे तडजोडी करते ते पाहता सध्यासाठी भाजपाचं एनडीए मॉडेल हे १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राबवलेल्या व्यवस्थेचा नवा अवतार आहेत. त्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांबाबत देवाणघेवाण होऊ शकते. या पश्चिम महाष्ट्रातील ग्रामीण भागात अजित पवार यांची ताकद आहे. तर शहरी भागात भाजपाचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समिकरण जुळून येऊ शकतं.  मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये असं फार काही नाही आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपा