Bhaskar Jadhav : "शहाजीबापू पाटलांना उगाच मोठं करुन ठेवलंय; शिवसेनेचा विश्वासघात केला, 2 वर्षांनी घरी बसणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 14:45 IST2022-09-12T14:38:07+5:302022-09-12T14:45:18+5:30
ShivSena Bhaskar Jadhav Slams Shahajibapu Patil : भास्कर जाधव यांनी आमदार शहाजीबापू पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

Bhaskar Jadhav : "शहाजीबापू पाटलांना उगाच मोठं करुन ठेवलंय; शिवसेनेचा विश्वासघात केला, 2 वर्षांनी घरी बसणार"
शिवसेना (ShivSena) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहाजीबापू पाटलांना उगाच मोठं करून ठेवलं आहे. त्याचं काय ते एक वाक्य... काय ते निष्ठेचं वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. सहा सहा वेळेस निवडणूक लढले, निवडून येऊ शकले नाही, शिवसेनेचा विश्वासघात केला असं म्हणत निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे.
भास्कर जाधव यांनी आमदार शहाजीबापू पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. "तुम्ही लोकांनी शहाजीबापू पाटील यांना उगाच मोठं करून ठेवलं आहे. त्याचं काय ते एक वाक्य... काय ते निष्ठेचं वाक्य आहे का?" असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. तसेच "त्यांना माहितीय शिवसेनेसोबत त्यांनी विश्वासघात केला. सहा सहा वेळेस निवडणूक लढले, निवडून येऊ शकले नाही. पण शिवसेना हे चिन्ह पाठीमागे होतं म्हणून आपण निवडून आलो आणि त्याच शिवसेनेशी आता आपण विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाच वर्षे नव्हे तर पुढच्या दोन वर्षांनी आपण घरी आहोत" असंही म्हटलं आहे.
"खोकी कुठली? आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही"
राज्यात राजकीय क्रांती घडल्याने अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोकी मिळाल्याचे सांगत आहेत. ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्यात शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
ते म्हणाले की, ठाकरे व शिंदे सरकारमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असून, मुख्यमंत्री शिंदे गतीने कामे करत आहेत. राजकारणात शरद पवार मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीत कोणाला निवडायचे, हे जनता ठरवत असते.