शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Ambadas Danve : "शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:42 IST

Shivsena Ambadas Danve And Suhas Kande : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा आरोप कांदे यांनी केला. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यानंतर आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करत आहेत. मातोश्रीवरून शंभुराजे देसाईंना फोन केल्याचा आरोप खोटा" असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच "झेड प्लस सुरक्षा हा विषय राज्य सरकारचा नसतो. सुरक्षेचा विषय हा केंद्राचा असतो आणि केंद्राने आता ती या लोकांना दिली आहे. शंभुराजे देसाईंकडे सिक्युरिटीचं कामच नाही. पण शंभुराजे आता त्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे ते काहीही सांगत आहेत. अशा प्रकारचा आरोप करत आहेत. आदित्य ठाकरे मतदारसंघात जात असल्याने सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे" असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सुहास कांदे म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, असा फोन वर्षावरून शंभूराज देसाई यांना आला होता, या सुहास कांदे यांनी केलेल्या दाव्याला शंभुराज देसाई यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंच्या जीविताला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धमदी देणारं पत्र आलं होतं, त्यांना सुरक्षा देण्याचं मी सभागृहात जाहीर केलं होतं. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. त्यानंतर मला वर्षावरून त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज नाही, असा फोन आला होता, असे देसाई म्हणाले. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे