तासगावात शिवराय आणि डॉ. आंबेडकरांच्या शिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 15:32 IST2019-02-15T15:23:47+5:302019-02-15T15:32:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूणार्कृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडला.

तासगावात शिवराय आणि डॉ. आंबेडकरांच्या शिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूणार्कृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडला.
प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सांगली जिल्ह्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूणार्कृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा व सामाजिक अधिकारिता शिबीरांतर्गत सहाय्यक उपकरण वितरणाच्या कार्यक्रम ठिकाणी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक खासदार संजय पाटील यांनी केले तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तासगाव शहरासाठी भुयारी गटार योजना व नगरपरिषद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजन केले.
याशिवाय मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांगाना उपकरण वाटप, प्रधान मंत्री आवास योजनेतील लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात निधी वाटप, नगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब वाटप आणि कृषी विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत संभाजी भोसले यांना ट्रॅक्टरची प्रतिकात्मक चावी सुपूर्द करण्यात आली.