शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात अवतरली मराठी चित्रपटसृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:02 AM

शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ््यातील साडेतीन तासांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारांगण अवतरले होते.

मुंबई : शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ््यातील साडेतीन तासांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारांगण अवतरले होते. भव्य मंचावर दिमाखदार दिलखेचक नृत्यांची रेलचेल होती. भव्यदिव्य मंच, चित्ताकर्षक रोषणाई अशा भारावलेल्या वातावरणात हा सोहळा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर रंगला."घरातला, हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाला. कलेचे पुजारी, कलाकारांना खूप प्रेम देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशा भावना पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी गणपती स्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करत व्यक्त केल्या.

शिवमणी यांच्या तालवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी सादर केलेल्या शिवसेना गीतावर शिवसैनिक थिरकले. ‘जात-गोत्र-धर्म आमचा...’ गाण्यावर शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना सचिव आदेश बांदेकर, सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, मधुरा वेलणकर, सुशांत शेलार, शरद केळकर, दिगंबर नाईक आदींनी सूत्रसंचालन केले.माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री लीलाधर डाके, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आदी या वेळी उपस्थित होते.महाराष्ट्राची लोकसंस्कृतीलोकनृत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृतीच रंगमंचावर अवतरली. वासुदेवाचं दान पावलं, आई भवानीचा जागर झाला. तारपा नृत्य सादर करायला खास मोखाडा येथून आदिवासी बांधव आले होते. कोळी गीतांनाही उपस्थितांनी चांगली दाद दिली.लावणी अप्सरांचा ठसकाअमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी ‘कर हर मैदान फतेह’ हे गीत शिवसेनेच्या विजयामागे शिवसैनिकांनी केलेल्या अथक परिश्रमाची आठवण करून देणारे ठरले. पार्श्वगायक कुणाल गांजावाला यांनी ‘खारी बिस्कीट’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांतील त्यांची गीते सादर केली.अजय-अतुल यांची कृतज्ञतासंगीतकार अजय-अतुल यांनी बालपणी त्यांच्या पोवाड्याचे शिवसेनाप्रमुखांनी कौतुक केले होते, ही आठवण सांगतानाच त्यांनी पोवाड्याच्या काही पंक्तीही सादर केल्या. अभिनेता श्रेयस तळपदे यानेही मराठी-हिंदी गीतांवर ताल धरला. बेला शेंडे यांच्या सुरांनीही मोहिनी घातली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे