Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: रवी राणांचा ताबा सुटला! पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 20:38 IST2022-04-23T20:36:35+5:302022-04-23T20:38:28+5:30
Ravi Rana to Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महापौरांनी आम्ही याची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. या शिवीगाळीवरून शिवसेनेचा कार्यकर्तादेखील रवी राणांवर गुन्हा दाखल करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: रवी राणांचा ताबा सुटला! पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राणा दाम्पत्याने जामिन घेण्यास नकार दिला असून थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मात्र, रवी राणा आणखी एका अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
पोलिस जेव्हा राणांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते, तेव्हा नवनीत राणा यांनी त्यांना बाहेर व्हा, असे सुनावले होते. तसेच रवी राणादेखील गुन्हा दाखल केल्यावरून संतापले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊतांवर देखील गुन्हा दाखल करा, तरच आम्ही मानू असे ते म्हणाले होते. तसेच वॉरंट दाखवत नाहीत तोवर आम्ही येणार नाही असे पोलिसांना सांगत येण्यास नकार दिला होता.
यानंतर पोलिसांसोबत ते काही वेळातच खाली आले. पोलिसांनी त्यांना शिवसैनिकांच्या उद्रेकात खार पोलीस स्टेशनला नेले. यावेळी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मिडीयाच्या कॅमेऱ्यांकडे पाहून रवी राणा यांचा बोलताना ताबा सुटला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार शिव्या दिल्या. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे आता राणांवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
यावर शिवसेनेच्या महापौरांनी आम्ही याची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. या शिवीगाळीवरून शिवसेनेचा कार्यकर्तादेखील रवी राणांवर गुन्हा दाखल करू शकतो, असे त्या म्हणाल्या. यावरून राणा दाम्पत्याची संस्कृती काय आहे हे समोर आले आहे. ज्यांना स्वत:ची जात कोणती ते माहिती नाही, असे लोक आम्हाला हनुमान चालिसा म्हणून दाखविणार होते, असा आरोप केला आहे.